कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे सत्र सुरूच आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी एकाच दिवशी केडीएमसीमधील तिघा अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात अटक केली. ही कारवाई केवळ धक्कादायकच नाही, तर केडीएमसीच्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.घनकचरा विभागातील वरिष्ठ निरीक्षक वसंत देवळूरकर आणि कर्मचारी सुदर्शन जाधव यांनी आजारी कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेण्यासाठी २५ हजारांची लाच मागितली होती. त्यातील २० हजार रुपये स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले. दुसऱ्या कारवाईत सहाय्यक नगर अभियंता रवींद्र आहिरे याला एका बिल्डरकडून बांधकाम परवानगीसाठी ४० हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.या प्रकरणांनी केडीएमसीमध्ये भ्रष्टाचाराचे जाळे किती खोलवर गेले आहे, याचा प्रत्यय येतो. आतापर्यंत केडीएमसीतील ४७ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर लाचखोरीच्या आरोपांतर्गत कारवाई झालेली आहे. सतत वाढणाऱ्या या घटनांनी नागरिकांमध्ये संतापाची भावना पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *