
डोंबिवलीच्या आयरे गावातील पाटील कुटुंबाने सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मूल्यांचा संगम साधत एक आगळावेगळा कौतुक सोहळा नुकताच पार पाडला. भागवताचार्य ह.भ.प. बाळकृष महाराज यांच्या हस्ते कुटुंबातील उच्च शिक्षित मुलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात जय अंबिका भक्त मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील आणि कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.शिक्षणाच्या विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या अश्विनी पाटील (सीएस), चिन्मय पाटील (कमर्शियल पायलट), सर्वेश पाटील (कॉम्प्युटर इंजिनिअर), स्नेहल लोखंडे (एम.कॉम, एल.एल.बी.), श्रेया पाटील (बीएमएम), स्वेता पाटील (बीएचएमएस), अदित्य पाटील (टुरिझम), स्वप्निल पाटील (एमबीए), रोशन व रिया पाटील (पॅरा ॲथलेटिक्स टेक्निकल ऑफिशियल्स) आणि पूजा पाटील (एमबीए) यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि कुटुंबातील शिक्षणप्राप्त सदस्यांची माहिती सेवानिवृत्त सहायक आयुक्त मनोहर पाटील यांनी दिली. बाळकृष महाराज यांनी पुढील पिढीनेही ही परंपरा जपावी, असा संदेश दिला. संपूर्ण सोहळा कुटुंबातील ऐक्य, शिक्षणप्रेम आणि संस्कृती यांचे सुंदर उदाहरण ठरला.
