डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील रेड चाईल्ड संस्थेच्या महात्मा गांधी शाळेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून शाळेला संगणक भेट देण्यात आला. तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थाचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षिका जोशी मॅडम यांच्या हस्ते स्वागत झाले. त्यानंतर मुख्याध्यापक सुरेश बोरसे यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी कविता गावंड, इंदिरा भोईर, रोषणा पाटील आणि प्रफुल पांचाळ यांचा सन्मान करण्यात आला.आपल्या भाषणात कविता गावंड यांनी जिजाऊ संस्थेच्या कार्याचा आढावा घेत सांगितले की, रत्नागिरी, शहापूर व झोडपोली येथे मोफत रुग्णालये चालवली जातात. गरीब रुग्णांना शस्त्रक्रिया, औषधे व उपचार मोफत मिळतात, याचा फायदा गरजू लोकांनी घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.दरम्यान, माजी विद्यार्थिनी इंदिरा भोईर यांच्या माध्यमातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या संगणक भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच निलेश सांबरे यांनी वह्या व खाऊचे वाटप करून विद्यार्थ्यांना दिलेल्या मदतीबद्दल त्यांचेही आभार मानले गेले.कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक सुरेश बोरसे यांनी खासदार शिंदे व सांबरे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *