कल्याण पूर्व – महालक्ष्मी शॉपिंग सेंटरजवळील खोल नाल्यात सोमवारी सायंकाळी एक तरुण पडल्याची घटना घडली. प्रवीण पवार असे या तरुणाचे नाव असून, तो मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत बाटल्या वेचण्यासाठी गेला असता तोल जाऊन खोल नाल्यात पडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच समाजसेवक भरत जाधव, सचिन आळंगे आणि महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उमेश विमल यमगर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे एक तास चाललेल्या बचाव कार्यानंतर प्रवीण पवार याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने तपासणी करून प्रवीण पवार यांची स्थिती स्थिर असल्याचे घोषित केले. दरम्यान, ही घटना लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना अशा धोकादायक ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

कल्याण पूर्व – महालक्ष्मी शॉपिंग सेंटरजवळील खोल नाल्यात सोमवारी सायंकाळी एक तरुण पडल्याची घटना घडली. प्रवीण पवार असे या तरुणाचे नाव असून, तो मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत बाटल्या वेचण्यासाठी गेला असता तोल जाऊन खोल नाल्यात पडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच समाजसेवक भरत जाधव, सचिन आळंगे आणि महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उमेश विमल यमगर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे एक तास चाललेल्या बचाव कार्यानंतर प्रवीण पवार याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने तपासणी करून प्रवीण पवार यांची स्थिती स्थिर असल्याचे घोषित केले. दरम्यान, ही घटना लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना अशा धोकादायक ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *