डोंबिवली : मुंबईनंतर आता डोंबिवलीतही राजकारणाची रंगत वाढताना दिसत आहे. आगामी ५ जुलै रोजी होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या विजयी सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) यांच्या बॅनर ची चांगलीच चर्चा आहे . सार्वजनिक ठिकाणी लावले गेलेले हे बॅनर्स मराठी अस्मितेचा मुद्दा अधोरेखित करत असून, स्थानिक नागरिकांचेही लक्ष वेधून घेत आहेत.शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शहरभर लावण्यात आलेल्या बॅनरवर मोठ्या अक्षरात लिहिले आहे

–”महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस ‘मराठी’ बोलतांना पाहायचं आहे… मग ही सुरुवात आहे!… आपल्याला जाहिर आमंत्रण – राज ठाकरे, उद्धव ठाकरे”या बॅनरमधील उल्लेखामुळे आगामी काळात मनसे-ठाकरे गट एकत्र येणार का, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. मात्र यावर अजूनही अधिकृत खुलासा झालेला नाही.दुसरीकडे, मनसेच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनरवर राज ठाकरे यांचे ठळक विधान झळकत आहे –”मी अत्यंत कडवट मराठी आहे आणि माज्यावरचे संस्कार पण तेच आहेत. – राज ठाकरे. माय मराठीच्या अस्मितेसाठी बहुसंख्येने उपस्थित राहूया!”या बॅनरमधून मनसेनेही मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आपली आक्रमक भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.सध्या डोंबिवलीत सार्वजनिक ठिकाणी या बॅनर्समुळे नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. एकीकडे ठाकरे गटाचे कार्यकर्ते राजकीय सभेच्या तयारीला लागले आहेत, तर दुसरीकडे मनसे कार्यकर्तेही जनतेशी थेट संवाद साधत आपली बाजू मांडत आहेत.राजकारणात मराठी अस्मिता, भाषा, संस्कृती आणि स्वाभिमानाचे मुद्दे पुन्हा एकदा केंद्रस्थानी येताना दिसत आहेत. ५ जुलै रोजी डोंबिवलीत होणाऱ्या विजयी सभेच्या माध्यमातून कोणता संदेश दिला जाणार आणि पुढील राजकीय समीकरणे कशी जुळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *