कल्याण |

ठाणे खंडणी विरोधी पथकाने कल्याणच्या बंदरपाडा परिसरात केलेल्या धडक कारवाईत फळविक्रेत्याच्या वेशात गंभीर गुन्ह्यांची आखणी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.अटक केलेल्या आरोपीचे नाव सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे (वय ३०) असे आहे. तो व्यवसायाने फळविक्रेता असला तरी, प्रत्यक्षात तो गावठी शस्त्रांसह गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय होता.पोलिसांनी त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ठाणे खंडणी विरोधी पथकाने बंदरपाडा भागात सापळा रचून त्याला अटक केली.या प्रकरणी त्याच्यावर शस्त्र अधिनियम कायदा कलम 3, 25 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)/135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सचिन शिंदेला कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ३० जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, खंडणी विरोधी पथकाच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *