डोंबिवली पहल गाम येथे सुरक्षादलांनी मोठी कारवाई करत या हल्ल्याला जबाबदार असलेल्या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ही कारवाई भारतीय लष्कर व स्थानिक पोलीस दलाच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत करण्यात आली. या कारवाईनंतर देशभरात एक समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे.या हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले या भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण डोंबिवली शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता या घटनेतील जबाबदार दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी दिलासा व्यक्त केला आहे.संजय लेले यांचे पुत्र हर्षल लेले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, “सरकारचे व लष्कराचे मन:पूर्वक आभार मानतो. आमच्यावर जे हल्ला केला गेला त्याचा बदला घेतला गेला. या दहशतवाद्यांना ठार करण्यात आले यामुळे आमच्या दु:खावर थोडा का होईना, पण फुंकर बसेल. देशासाठी शहीद झालेल्या वडिलांचा अभिमान वाटतो.”हर्षल लेले यांच्या या प्रतिक्रियेला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून अनेकांनी त्यांची धैर्यशील प्रतिक्रिया म्हणून प्रशंसा केली आहे.दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाच्या स्थानिक युनिटशी संबंधित होते. हे दहशतवादी पुढील मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते, मात्र सुरक्षादलांच्या सतर्कतेमुळे त्यांची योजना उधळून लावण्यात आली.देशभरातून या कारवाईचे स्वागत होत आहे आणि शहीद संजय लेले यांना कृतज्ञतेने अभिवादन करण्यात येत आहे.
