डोंबिवली, नांदिवली रोड, समर्थ नगर चौक येथे एकनिष्ठ मित्र मंडळातर्फे आयोजित भव्य दहीहंडी उत्सव 2025 जल्लोषात पार पडला. समर्थनगर नांदिवली येथे हा उत्सव सलग तिसऱ्या वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी अनेक गोविंदा पथकांनी उंच उंच मनोरे रचून दहीहंडीला सलामी दिली.

विशेष म्हणजे, कोकण बॉईज या गोविंदा पथकाने उभारलेल्या मनोऱ्यादरम्यान लावलेल्या बॅनरवर ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचे छायाचित्र झळकले. या बॅनरमुळे उपस्थितांमध्ये विशेष चर्चा रंगली.

यावेळी विचारणा केली असता माजी आमदार सुभाष भोईर म्हणाले, “आम्ही जरी राजकारणात एकमेकांविरोधात लढलो असलो तरी शेवटी आम्ही जुने मित्र आहोत. ही मैत्री शेवटपर्यंत कायम राहील. राजकारण हे फक्त काही महिन्यापुरते असते, पण समाजकार्य हेच खरे शाश्वत असते. दहीहंडीप्रमाणे गोविंदा पथके एकत्र येतात, त्याचप्रमाणे आम्ही दोघेही पुन्हा एकत्र येऊन समाजाच्या प्रश्नांवर उपाय शोधू.”

या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. दोन्ही माजी आमदार एकत्र आल्याने समर्थ नगर दहीहंडी उत्सव ‘राजकारणातील स्पर्धेपलीकडील मैत्री’चे प्रतीक ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *