मुंबई ( प्रतिनिधी) : शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, बँक खाते, वीज जोडणी व नळ जोडणी इत्यादी कागदपत्रे नावावर असताना 1995 पूर्वीची झोपडपट्टी वाचवण्यासाठी एका कुटूंबाने महिन्याभरापासून आझाद मैदानात आंदोलन छेडले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा शेख कुटुंबाने पत्रकार परिषदेत दिला.
कुर्ला (प.)येथील बैल बाजार परिसरात नूरजहाँ अब्दुल समद शेख ही महिला 1992 सालापासून राहत आहे. महाराष्ट्र शासनाच्या विद्यमान धोरणा नुसार 1992 ते 2000 साला पर्यतचे सर्व पुरावे त्यांच्याकडे आहेत.
शेजारील एका महिलेने तिचे राहते घराची उंची मे २०२२ ला वाढवली .तेव्हा ती महिला नूरजहाँ यांना म्हणाली की ,तुमचे घरावरील पत्रे बाजूस काढून घ्या. पत्रे फुटले तर माझी जबाबदारी नाही. म्हणून नूरजहाँ यांनी घरावरील पत्रे बाजूस केले. त्या महिलेने तीची भिंत त्यांच्या घरापेक्षा थोडी जास्त उंची वाढविली. व सिमेंटचा पत्रा टाकून घेतला.
घरात पावसाचे पाणी येवू नये म्हणून नूरजहाँ यांनी ही नाईलाजाने त्यांच्याप्रमाणेच घराची उंची पुर्वीच्या उंचीत थोडीशी वाढ करून त्यावर सिमेंटचे पत्रे टाकले.
सदर महिलेने या विरोधात कुर्ला एल विभाग कार्यालयात नूरजहाँ यांच्या विरोधात तक्रार केली. महानगरपालिका अधिकाऱ्यांनी बांधकाम का केले म्हणून त्यांना नोटीस क्र. L/D01L/163/354A MMC Act / 485 No.1/02-5-2022 Ref. 143205 पाठवली. व त्यांनी केलेले बांधकाम तोडून टाकले.ते तोडलेले बांधकाम अद्याप आहे तसेच आहे.त्यात काहीही बदल केलेला नाही. तरी सुध्दा माझ्या शेजारील महिलेने पुन्हा महानगरपालिकेत तक्रार केली .एल-विभाग म.न.पा. कार्यालयातील संबंधीत अधिकाऱ्यांना भेटून नूरजहाँ यांनी माझे घर तोडू नका अशी विनवणी केली .मात्र आमच्यावर राजकीय दबाब असल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले ,असे नूरजहाँ यांचे म्हणणे आहे. तसेच तुम्ही न्यायालयात जाऊन दाद मागा असा सल्ला ही मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या सचिवाने दिल्याचे नूरजहाँ सांगतात.आपले घर वाचावे म्हणून नूरजहाँ या कुटूंबासह गेल्या महिन्याभरापासून आझाद मैदानात आंदोलनास बसलेल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाने सन 1999,1995,2000 च्या शासनाच्या पुरोगामी विचाराने परिपत्रकात झोपडीची उंची 14 फूट करण्यात आली आहे. कुर्ला बैलबाजार परिसरात अनेक लोकांच्या झोपडीचे 2/ 2 मजले आहेत. 14 फुट ऐवजी 25/30 उंचीच्या झोपडया उभारलेल्या आहेत. जर माझी 14 फुट उंचीची झोपडी राजकिय नेत्याच्या आकसाने जुलुम करून तोडणार असतील तर बैलबाजारातील उंच झोपडया प्रथम का तोडण्यात येऊ नये असा संतप्त सवाल नूरजहाँ यांनी केला आहे. माझ्याकडे शासनाचे सर्व पुरावे असताना
माझ्या सारख्या गरीब महिलेच्या झोपड्याला जो पर्यत शासनाकडून संरक्षण मिळत नाही, तो पर्यत आझाद मैदान सोडणार नाही असा निर्धार नूरजहाँ शेख यांनी आजच्या पत्रकार परिषदेत बोलून दखविला आहे.
त्यांच्या या आंदोलनात विठ्ठलराव सोनवणे व राजेश वानखेडे या सामाजिक कार्यकर्त्यांचे पाठबळ लाभले आहे.त्यांनी या महिलेला न्याय मिळावा म्हणून खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
