आपल्या विचाराचा आणि हक्काचा आमदार निवडून द्या !

कृषी व पणन  राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे आवाहन

फलटण :  मतदारसंघात विकासात्मक कामे होऊ नये म्हणून इथले लोकप्रतिनिधी पटाईत आहेत. परंतु १२ दिवसात तुमच्या हक्काचं पाणी आणून देणारा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना निवडून दिले. आता भाकरी पलटण्याची वेळ आली आहे. आता पुन्हा एकदा आपल्या विचाराचा आणि हक्काचा आमदार निवडून द्या असे  आवाहन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी फलटण मतदार संघाचे उमेदवार दिगंबर आगवणे यांच्या प्रचारार्थ आयोजित  सभेत केले

फलटण  मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार  दिगंबर आगवणे यांच्या प्रचारार्थ नाकबोमवाडी, मिरढे आणि जिवली येथे  बैठकीस कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी हे आवाहन याच सरकारने मराठा आरक्षण दिले. धनगर आरक्षण टिकेल असे अॅफिडीवीट कोर्टात दिले. जलयुक्त शिवार हि एक महत्वाची योजणा याच सरकारने राबवली असेही सदाभाऊ यांनी सांगितलं.

दिगबर आगवणे हा एक साधा माणूस आहे. सर्वसामान्य माणसात वावरणारा व आपल्यात मिसळणार हा माणूस आहे. तो मोठ मोठ्या वाड्यावर जाणारा नाही तर वाडीवस्त्यांवर जाणारा आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करुन पुन्हा विकासाची गंगा या मतदार संघात आणुया असे आवाहन सदाभाऊनी केले.

***

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *