लोकसभेला जशी धैर्यशील माने यांना साथ दिलीत, तशीच गौरवभाऊ यांना साथ द्या – ना.सदाभाऊ खोत*
इस्लामपूर (प्रतिनिधी) : आपण सर्वांनी जशी लोकसभा निवडणुकीला धैर्यशील माने यांना साथ देऊन त्यांना विजयी केले.तसे यावेळी आपण विधानसभेला गौरवभाऊ नायकवडी यांना साथ देऊन त्यांना विजयी करूया असे आवाहन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार गौरवभाऊ नायकवडी यांच्या प्रचारार्थ शिगाव येथे आयोजित जाहीर सभेस ते बोलत होते.
शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळावा म्हणून ऊसाचा भाव बांधून घेतला.पेरणी ते कापणी करिता शेतकऱ्यांना पैसे दिले. गेली अनेक वर्षाची मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली व मराठा समाजाला आरक्षण दिले.धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कोर्टात अपोफीत घातले व आदिवासीच्या सर्व योजना लागू केल्या.आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून १० कोटी रुपये गरजू लोकांना मिळवून दिले.शिगावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर केला व त्या योजनेचे काम सुरू आहे. शिगावच्या विकासासाठी जेवढा निधी दिला आहे.जर तो निधी विरोधकांनी मोजायला सुरुवात केली तर त्यांना दम लागेल.आम्ही जनतेची कामे करत असताना कधी कोणाचा पक्ष बघितला नाही. हुतात्मा कारखाना जर नागनाथआण्णा यांनी स्थापन केला नसता तर महाराष्ट्राला ऊसाला भाव किती मिळतो हे कळलेच नसते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने कृषी महाविद्यालय मंजूर केले व त्याचे काम सुरू आहे.तालुक्याचा विकास करण्यासाठी आपण गौरवभाऊ नायकवडी यांना विजयी करून परिवर्तन घडवूया.
यावेळी नीताताई केळकर,उमेदवार गौरवभाऊ नायकवडी, वैभवदादा शिंदे,स्वरूपराव पाटील, पूजाताई झोळे,सागरभाऊ खोत, पं.स सदस्य मनीषा गावडे, संग्रामसिंह पाटील,अमोल पडळकर,बबन पाटील,संजय चव्हाण, कृष्णा गावडे, सागर गावडे,अरुण गावडे,कोळी सर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
