शहापूर : शहापूर वनविभागातील निवृत्त वनपाल अण्णा शंकर उबाळे यांच्या पत्नी अनिता अण्णा उबाळे यांचे २६ एप्रिल रोजी शुक्रवारी पहाटे ३ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय ६३ वर्ष इतके होते. पत्रकार अविनाश उबाळे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने शहापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवार ५ मे रोजी सकाळी ११ वाजता शहापूर येथे दिव्यज्योती अपार्टमेंट, वारघडे नगर,येथील त्यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आला आहे.

शहापूर तालुक्यातील बेडीसगाव हे त्यांचे मुळगाव नोकरी व शिक्षणासाठी हे कुटूंब गेल्या अनेक वर्षांपासून शहापूर येथील दिव्यज्योती अपार्टमेंट, वारघडे नगर, येथे वास्तव्यास आहे. दिवगंत अनिता उबाळे यांना आंबेडकरी चळवळ व समाजाप्रती विशेष अभिमान होता त्या सामाजिक कार्यक्रमात नेहमी सहभागी होत असतं अनिता यांचा स्वभाव अंत्यंत प्रेमळ व मनमिळाऊ होता.त्यांच्या या स्वभावामुळे विविध समाजातील लोकांशी त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. कुटूंबातील नातेवाईकांशी देखील त्यांनी जिव्हाळा जोपासला होता.दिवंगत अनिता उबाळे यांनी बेडीसगाव या आपल्या मुळ गावाशी आपली नाळ कायम जोडली होती.अनिता यांच्या पश्चात पती,एक मुलगा, दोन मुली, सुन,नातवंडे असा मोठा उबाळे परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!