राज ठाकरेंच्या व्यंगचचित्राचे फटकारे फेसबूकवर

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यंगचचित्राचे फटकारे फेसबूकवर पाहावयास मिळणार आहेत. येत्या २१ स्प्टेंबरला घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज फेकबूकवरून भेटीला येत आहेत.  लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागल्याने अनेक दिवसांपासून राज ठाकरे शांत होते. घटस्थापनेच्या दिवशी दादरमध्ये खास कार्यक्रमात राज ठाकरेंच्या फेसबुक पेजची सुरुवात करण्यात येणार आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे तरुणांशी थेट जोडले जाणार आहेत. “व्यंगचित्रांचे ठाकरी फटकारे अन् दांभिकतेवर गरजणारी ‘राज’गर्जना आता फेसबुकवर” कुणाकुणावर वार करते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!