उत्तम हवामान, निसर्ग सौदंर्याचा वरदहस्त, ऐतिहासीक वारसा आणि टप्याटप्याने विकसीत होणारे ठिकाण म्हणजे वांगणी ! दिवसेंदिवस घरांच्या किंमती वाढत असतानाच सामान्य ग्राहकांचे हित लक्षात घेऊन चड्डा रवेरीया आणि म्हाडा यांच्या जॉईंट वेन्चरच्या माध्यमातून वांगणीत मेगा टाऊनशिप प्रकल्प साकारला जात आहे. सर्व सोयीसुविधांनी युक्त असा निसर्गरम्य ठिकाणी सर्वसामान्य, मध्यमवर्गीय कुटूंबियांना परवडतील अशा किंमतीत  सेकंड होमचा पर्याय यामुळे उपलब्ध झाला आहे. त्यामुळे निसर्गरम्य व प्रदुषणमुक्त ठिकाण असलेल्या वांगणीकडे सर्वसामान्य ग्राहकांची पावले वळू लागली आहेत. 

ठाणे जिल्ह्याच्या दक्षिण सरहद्दीवर, माथेरान च्या पर्वतरांगांच्या कुशीत, उल्हास नदीच्या तीरावर वसलेले हे टुमदार शहर म्हणजे वांगणी ! ठाणे आणि रायगड च्या सीमेवर वसलेल्या ह्या वांगणी शहराला नुसता भूगोल नाही तर इतिहास ही लाभला आहे . सुंदर हवामान ,प्रदूषण रहित वातावरण आणि एक वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना यामुळं खगोल विज्ञान क्षेत्रात निरीक्षणा साठी एक महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून वांगणी ओळखल जातं.  गावाच्या वेशीवर वाहणारी उल्हास नदी , एखाद्या वर्तुळाच्या व्यासप्रमाणे गावाच्या मध्यातून जाणारा कल्याण – कर्जत महामार्ग विकासाला चालना देणारा आहे.  

रेल्वे आणि रस्त्याची कनेक्टीव्हिटी …..

वांगणी रेल्वे स्थानक आजही मध्य रेल्वे च एक महत्त्वाचं स्थानक म्हणून नावलौकिक मिळवून आहे. कर्जत मार्गावरील बदलापूरपुढील स्टेशन म्हणजे वांगणी… रेल्वे बरोबरच रस्त्याची कनेक्टीव्हिटी आहे. आजही सर्व मुंबईकर सेकंड होम म्हणून वांगणी लाच पसंती देत आहेत.   वांगणी ला लाभलेल्या ऐश्वर्यसंपन्न निसर्गाने चित्रपट निर्मात्यांना भूरळ पाडते. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी आपल्या पहिल्या “राजा हरिश्चंद्र” या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वांगणी हे ठिकाण त्याकाळी ब्रिटिश काळात १९१३ साली निवडलं होत हे प्रत्येक वांगणीकर अभिमानानं सांगतो. त्यामुळे अशा निसर्ग संपन्न वांगणीतचड्डा रवेरिया आणि म्हाडा यांच्या जॉईंट व्हेन्चरच्या माध्यमातून मेगा टाऊनशिप प्रकल्प साकारला जात आहे. 

अवघ्या २५ हजारात बुकिंग …

वांगणी स्टेशनपासून काराव गावात  १३३ इमारतींचा मेगा टाऊनशिप  प्रकल्प साकारला जात आहे. वांगणी स्टेशनपासून प्रकल्पस्थळी जाण्यासाठी पिक अपची व्यवस्था आहे.  १ बीएचके प्लॅटची  किंमत १८. ५० लाख रूपये आहे. तसेच बँकेकडून लोनची सुविधा आहे. अवघ्या २५ हजार रूपयात बुकिंग करता येणार आहे. या प्रकल्पात लहान मुलांसाठी प्ले पार्क, ज्येष्ठ नागरिकांसाठी पार्क, व्यायाम शाळा, स्वीमिंग पूल, स्केटींग रिंग, अॅम्पीथिअटर, शॉपिंग कॉम्लेक्स, शाळा, हॉस्पीटल, क्लब हाऊस, एटीएम अशा अनेक अॅमिनिटीजचा समावेश आहे.

असा आहे प्रकल्प ….

वांगणीपासून ३ किमी अंतरावर असलेल्या काराव या गावात  सुमारे १०० एकर जागेवर हा  मेगा टाऊनशिप प्रोजेक्ट होत आहे. या प्रकल्पात  सात मजली  १२२ टॉवर बांधण्यात येणार आहेत. यामध्ये सुमारे ८ हजार २०० प्लॅट बांधण्यात येत आहेत. त्यात म्हाडाचे ४ हजार प्लॅट  तर चड्डा रवेरिया ग्रुपचे ४ हजार २०० प्लॅट आहेत. यामध्ये क्लब हाऊस, गार्डन्स, कर्मशियल, मॉल शाळा आदी सोयी सुविधा असणार आहेत. सर्वसामान्यांना परवडतील अशा किंमतीत  चड्डा रवेरिया आणि म्हाडा यांच्या जॉईंट व्हेन्चरच्या माध्यमातून हा मेगाटाऊनशिप प्रकल्प साकारला जात आहे.  सध्या ३३ इमारतींचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. अशी माहिती  चड्डा रवेरीया ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डिंपल चड्डा यांनी दिली. 

संतोष गायकवाड (पत्रकार ) ९८२१६७१७३७

प्रकल्पातील प्रमुख वैशिष्टे ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!