
डोंबिवली : ता :१८;(प्रतिनिधी):- शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम आणि खेळ यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या डीएसओ क्रीडा स्पर्धांमधील गैरव्यवस्थापन आणि अकार्यक्षमता यामुळे अनेक शालेय खेळाडूंचे मोठे नुकसान होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.यासंदर्भात मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन खेळाडूंना भेडसावणाऱ्या समस्याबाबत लेखी निवेदनाद्वारे सादर केल्या आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून डीएसओ स्पर्धांसाठी विशेष बजेट मंजूर केले जाते. मात्र नियोजनाच्या अभावामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मनसे विद्यार्थी सेनेच्या निवेदनात पुढील मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. त्यामध्ये इतर महापालिकांमध्ये वेळेत नोंदणी सुरू होते, मात्र कल्याण-डोंबिवलीमध्ये नोंदणी सर्वात शेवटी सुरू होते. परिणामी शिक्षक व विद्यार्थ्यांना फार कमी वेळ मिळतो.एकाच दिवशी दोन किंवा त्याहून अधिक खेळांच्या स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या जातात. त्यामुळे मर्यादित क्रीडा शिक्षक असलेल्या शाळांना काही स्पर्धांना मुकावे लागते.शाळेत कार्यरत नसलेल्या शिक्षकांना स्पर्धांचे आयोजन, मुलांच्या जेवणाचे, खाऊचे, पाण्याचे कंत्राट दिले जाते. त्यामुळे मुलांच्या सोयी-अपायाकडे दुर्लक्ष होते.काही महत्त्वाच्या खेळांसाठी आवश्यक साहित्य महापालिकेकडे उपलब्ध नाही. उदाहरणार्थ, अॅथलेटिक्ससाठी हरडल्स नाहीत, कबड्डी साठी मॅट्स नाहीत.गेल्या दोन वर्षांपासून अॅथलेटिक्सच्या स्पर्धा महापालिका क्षेत्राबाहेर, मुंब्रा येथे घेतल्या जातात. गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास करणे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरते.खोट्या पंचांची संख्या दाखवून अतिरिक्त खर्च दाखवण्यात येतो. त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी निधी खर्च केला जात नाही.इतर ठिकाणी क्रिकेटसाठी १० ओव्हर्सचे सामने घेतले जात असताना येथे फक्त १-२ ओव्हर्सचे सामने घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना कौशल्य दाखवण्याची संधी मिळत नाही.
फुटबॉल स्पर्धा देखील महापालिका हद्दीबाहेर टिटवाळ्यात घेतली गेली. नियोजनाअभावी अनेक शाळांना कोणतीही मॅच न खेळताच परत जावे लागले.स्पर्धांसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून फी घेतली जाते. तरीही मुलांना बक्षीस, ट्रॉफी देण्याचे प्रमाण कमी आहे. प्रमाणपत्रही केवळ ऑनलाइन पीडीएफ स्वरूपात दिली जाते.जिल्हास्तरीय स्पर्धेनंतर विभागीय स्पर्धांसाठी शिक्षकांना स्वतंत्रपणे कागदपत्रासाठी धावपळ करावी लागते. ही प्रक्रिया स्पर्धास्थळीच पूर्ण व्हावी अशी मागणी करण्यात आली.
तथापि या सर्व त्रुटींवर महापालिकेने तातडीने लक्ष देऊन, योग्य कार्यवाही करण्याची मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेने क्रीडा क्षेत्रातील गैरव्यवस्था थांबवावी, विद्यार्थ्यांना सुविधा द्याव्यात आणि योग्य नियोजन करून खेळाडूंना न्याय द्यावा, असे म्हात्रे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
दरम्यान याबाबत मनवीसे शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांनी सांगितले की कल्याण डोंबिवली महानगरपालिका ज्या शाळा, महाविद्यालय स्तरावरील स्पर्धा घेते. तर दोन ते तीन वर्षांपासून असं होती कि, आपल्या ऍथलेटिकच्या ज्या स्पर्धा होतात त्या ठाणे महापालिका क्षेत्रातील कौसा येथील स्टेडियम मध्ये होतात. माझा मुख्य प्रश्न आहे आयुक्तांना कि, कल्याण डोंबिवली महापालिका एवढी मोठी असताना आपल्याकडे क्रीडांगण नाही आहे कि, आपल्या हद्दीतील स्पर्धा ठाणे महापालिका हद्दीत ठेवाव्या लागत आहेत. टिटवाळा पासून खेळाडूंना खेळायला यायचं असेल तर ते ट्रेनने येत असतील. आपण पाहतोय दुर्घटनांचे सत्र तर ती जबाबदारी कोण घेणार ? संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल एवढं मोठं आहे. सुभाष मैदान एवढं मोठं आहे तिथे का स्पर्धा होत नाहीत ? आपण ते ट्रॅक का बसवू शकत नाही ? तसेच क्रिकेटच्या स्पर्धा ठाणे,मुंबई महापालिकेच्या स्पर्धा लेदर बॉल वर होतात. आपल्याकडे दोन आणि तीन ओव्हरमध्ये मॅच संपवल्या जातात. कोणीही अधिकृत पंच नसतात. क्रिकेटच्या मॅच भिवंडीत होतात. अंडर ४० क्रिकेटच्या मॅच वायलेनगरला होतात. बाकी सर्व स्पर्धा भिवंडीत होतात. पोहण्याच्या स्पर्धा केडीएमसी हद्दीत होतात तिथे ट्रक्स नसतात. फक्त एका रो मध्ये लाईन असते आपण ट्रक्स सुद्धा अफोर्ड करून शकत नाही का ? असा माझा केडीएमसीला प्रश्न आहे. महिला खेळाडूंना चेंजिंगसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. ना तिथे खाण्या पिण्याचे ठेका दिलेला असतो तिथे बिस्किटाचे पुडे आणि पाण्याच्या बाटल्या येतात त्या दुपारी दिड ते दोन वाजता येतात. हे मी स्वतः पाहिलं आहे म्हणून मी स्वतः आयुक्तांना भेटलो आणि त्यांना हे सर्व संगितलं त्यांनी देखील सर्व सकारात्मक निवेदन वाचून घेतलं आहे. यावर मी लवकरच काही तरी कारवाई करेल आणि हे खेळ कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कसे होतील याचा प्रयत्न करेल असं म्हटलं आहे.
पुढे जाऊन म्हात्रे यांनी सांगितले की १०० टक्के भ्रष्टचार होत आहे. भ्रष्टाचार आहे म्हणून इथे काही बनत नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेत आपल्याला स्वप्न दाखवले एक क्रिकेटचं ग्राउंड आणि पीच नाही.आता पर्यंत जेवढ्या क्रिकेटच्या आयपीएलमध्ये सर्वाना संधी मिळाली अनेक जण भारतीय संघात आले पण कल्याण डोंबिवली भागातील कोण जातंय ? सुविधाच नाही आयोजन नाही इकडे काही. माझं म्हणणं आहे कि, खेलो इंडिया खेलो एवढं मोठं प्लॅटफॉर्म मिळालं आहे ऑलिम्पिकला जाण्यासाठी आपल्या ऍथलेटिक तिकडे होत असतील तर या मुलांनी करायचं काय ? कोणाला एवढ्या लांब पाठवायचे नसतील कोणीतरी चांगला होतकरू असेल तो जाणार नाही तिथे ! कल्याण डोंबिवली महापालिका जी फी घेते प्रत्येक विद्यार्थ्यांकडून फी घेतली जाते या स्पर्धांची दुसरी महत्वाची गोष्ट ऍप्रिसिएशन दोन वर्षपूर्वी आयुक्त जाखड होत्या त्यावेळी कल्याण मध्ये कार्यक्रम झाला होता. प्रत्येक खेळाडूला मेडल आणि प्रमाणपत्र मिळाले होते. दोन वर्षात एकालाही मेडल, प्रमाणपत्र मिळाला नाही. प्रत्येकाने ऑनलाईन सर्टिफिकेट डाउनलोड केलेला आहे. सांगितलं आहे कि, तुमचा सर्टिफिकेट डाउनलोड करा. म्हणजे सर्टिफिकेट सुद्धा देऊ शकत नाही कल्याण डोंबिवली महानगरपालिका तर कारभार हा सुरु आहे हेच मला कळत नाही आहे. आता या एक-एक स्पर्धा सुरु होणार आहेत. मी निवेदन दिल आहे मी स्पेसिफिक सांगितलं आहे काय काय होतय. तर त्या प्रमाणे नाही झाल्या आणि मी जेन्युइन मागणी करतोय अवास्तव मागणी करत नाही आहे. जर त्या प्रमाने नाही झालं तर आम्ही आंदोलन मनसे स्टाईलने आंदोलन करणार, असे म्हात्रे यांनी सांगितले, दरम्यान महापालिका प्रशासन आणि आयुक्त लक्ष देणार का हें पहावे लागेल…

—–
