कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सध्या कार्यरत असलेल्या ३७० आशा स्वयंसेविका व २ आशा गट प्रवर्तक यांना देखील रुपये ५,०००/- सानुग्रह अनुदान देण्यास महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी आज मंजूरी दिली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिकारी वर्गास तसेच वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचारी वर्गास रुपये १८,०००/- सानुग्रह अनुदान यावर्षी देण्यात येणार असल्याची माहिती यापूर्वीच महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सध्या कार्यरत असलेल्या ३७० आशा स्वयंसेविका व २ आशा गट प्रवर्तक यांना देखील रुपये ५,०००/- सानुग्रह अनुदान देण्यास महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी आज मंजूरी दिली आहे. आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना प्रथमतः सनुग्रह अनुदान प्राप्त होणार असल्यामुळे त्यांच्यामध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!