
डोंबिवली :
पलावा पुलाचे अखेर लोकार्पणकल्याण शीळ रोडवरील बहुप्रतिक्षित पलावा पुलाचे अखेर लोकार्पण झाले असून, कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळाला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे शिवसेना (शिंदे गट) आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले.गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची प्रतीक्षा सुरू होती. पुलाच्या कामातील विलंबामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवत होते. स्थानिक आमदार आणि सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दात टीकाही करण्यात आली होती.या दबावामुळेच अखेर प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुलाच्या कामाला गती दिली आणि आज लोकार्पणाचा दिवस उगवला.लोकार्पणप्रसंगी आमदार राजेश मोरे यांनी सूचक भाषेत आंदोलनकर्त्यांवर निशाणा साधत सांगितले की,”आम्ही ट्विटर-इन्स्टाग्रामवर टीका करत नाही. आम्ही प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून काम करतो.”या वक्तव्याद्वारे त्यांनी नाव न घेता मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांना टोला लगावला.दरम्यान, सामाजिक आणि राजकीय दृष्टीने पाहता हे आंदोलन यशस्वी ठरल्याचे चित्र असून, मनसे आणि ठाकरे गटाच्या एकत्रित दबावामुळेच प्रशासनाला पुलाचे काम मार्गी लावावे लागले, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.पुलाच्या लोकार्पणानंतर आता कल्याण शीळ रोडवरील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जर आहे
