डोंबिवली,

राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, अरुणोदय प्राथमिक शाळेने फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून, शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तम कामगिरीद्वारे शाळेचे व शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.या निकालात शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवून शिष्यवृत्तीस पात्रता मिळवली आहे . त्यामध्ये कुमार भूषण समीर सक्रे याला एकूण 224 गुण मिळवून 75% पटकावून जिल्ह्यातील 59 वा क्रमांक मिळाला आहे. कुमार अजिंक्य अविन मंडलिक याला एकूण 204 गुण मिळवून 68% पटकावून जिल्ह्यातील 149 वा क्रमांक मिळाला आहे. कुमारी शुभ्रा राकेश साळवी हिला एकूण 186 गुण मिळवून 62% पटकावून जिल्ह्यातील 356 वा क्रमांक मिळविला आहे.

या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सुरेश नारोळे, संस्थेचे अध्यक्ष, कार्यवाह, संस्था पदाधिकारी, तसेच शाळा समिती अध्यक्ष व शाळा समिती पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.विद्यार्थ्यांच्या या अपूर्व यशाच्या निमित्ताने शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना चॉकलेट, फुले आणि शालेय उपयोगी वस्तूंची भेट देऊन त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. शाळेतील शिक्षक, पालक, तसेच संस्थेच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्गदर्शनाचा आणि प्रेरणेचा हा सुफळ परिणाम आहे, असे मत मुख्याध्यापक सुरेश नारोळे यांनी व्यक्त केले. शाळेच्या या यशामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असून, भविष्यातही असेच यश मिळवण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *