
डोंबिवली, दि. ११ ऑगस्ट –डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदीर रोडवर अत्याधुनिक आरोग्य सेवा देणारे अँपल पॉलीक्लिनिक सुरु झाले असून, याचे लोकार्पण आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. हे पॉलीक्लिनिक डॉ. संतोष गोरे (चेंज फिजिशियन), डॉ. प्रतीक भुजबळ (ऑर्थोपेडिक) आणि डॉ. शालवी भुजबळ (वर्टिगो स्पेशालिस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आले आहे.उद्घाटन प्रसंगी आमदार राजेश मोरे यांनी अँपल पॉलीक्लिनिकच्या उपक्रमाचे कौतुक करत, “येथे रुग्णांवर केवळ उपचारच नव्हे, तर सेवा भावनेने उपचार केले जातील, ही बाब विशेष आहे,” असे सांगितले.डॉ. संतोष गोरे यांनी यावेळी, “आमच्या पॉलीक्लिनिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचे योग्य निदान करून त्याला पूर्णपणे बरे करण्याचा प्रयत्न करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे,” असे नमूद केले.दरम्यान, डॉ. शालवी भुजबळ यांनी वर्टिगो आणि आरोग्यविषयक सुविधांबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, “रुग्णाला चक्कर येत असल्यास न्यूरोलॉजिस्ट किंवा ईएनटी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. काहीवेळा हवामानातील बदल, विशेषतः वातावरणाच्या दाबातील चढउतारामुळे चक्कर येऊ शकते.”या लोकार्पण सोहळ्याला अनेक मान्यवर, स्थानिक राजकीय मंडळी तसेच इतर क्षेत्रातील डॉक्टर उपस्थित होते. अँपल पॉलीक्लिनिकमुळे डोंबिवली परिसरातील नागरिकांना एकाच छताखाली बहुविध आरोग्य सेवा मिळणार आहेत.
