मुंबई : मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. एसटी कर्मचा-यांच्या संपावर अजूनही तोडगा निघत नसल्याने आंदोलनाची धग वाढतच आहे. यामुळे सर्वसामान्य एसटीच्या प्रवाशांचे हाल कायमच आहेत. रविवारी कर्मचा-यांनी अनोखं आंदोलन केले. यावेळी आंदोलनकत्यांनी एकाच वेळी मोबाईल प्लॅश सुरू करीत सरकाराचा निषेध केला.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण तसेच अन्य मागण्यांना घेऊन हे आंदोलन सुरु आहे. आझाद मैदानात शेकडो एसटी कर्मचाऱी ठाण मांडून बसले आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर तसेच माजी मंत्री सदाभाऊ खोत आझाद मैदानात कर्मचाऱ्यांसोबत मागील अनेक दिवसांपासून उपस्थित आहेत. रविवारी रात्री कर्मचा-यांनी अनोखं आंदोलन केलं. कर्मचाऱ्यांनी आपापल्या मोबाईलचे फ्लॅशलाईट सुरु करुन रात्रीच्या अंधारातदेखील आमचा लढा चालू असल्याचा संदेश सरकारला दिला. धुळे आगारातील बस मार्गस्थ हेात असताना दगडफेक तसेच जळगावहून चोपडाकडे जाणा-या बसवर दगडफेक करण्यात आली बसची काच फोडण्यात आली.

सदाभाऊ खोत यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर घणाघाती टीका केली. राज्यात मोगलाई सुरु आहे का. परिवहनमंत्र्यांच्या निलंबनाचा मुद्दा हाती घेऊ. राज्यात उद्या सरकारचं तेरावं घालणार. तसेच परवा 14 वं घालण्यातं येईल. 15 व्या दिवशी परब यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिलाय.

२३८ एसटी कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा
राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरु आहेत. संप मागे घ्या, असे आवाहन करुनही कर्मचारी ऐकत नसल्याने एसटी महामंडळाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यात २३८ एसटी कर्मचा-यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *