ज्येष्ठ पत्रकार भगवान मंडलिक यांना राज्यशासनाचा  शि.म.परांजपे पुरस्कार जाहीर

 डोंबिवली (प्रतिनिधी) : राज्यशासनातर्फे पत्रकारिता क्षेत्रासाठी कोकण विभागासाठी देण्यात येणारा शि. म. परांजपे पुरस्कार
 लोकसत्ताचे कल्याण डोंबिवली प्रतिनिधी व अभ्यासू पत्रकार भगवान मंडलिक यांना जाहीर झाला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शनिवार 27 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मंडलिक याना राज्यशासनाचा पुरस्कार जाहीर होताच त्यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच डोंबिवली पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार  मंडलिक यांचा सत्कार करण्यात आला.
***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *