आश्चर्य :  दोन तोडं आणि शरीर एकच, बाळ जन्माला 

सोलापूर : सोलापूच्या सिव्हिल रूग्णालयात गुरूवारी  दोन तोंड आणि शरीर मात्र एकच असलेले बाळ जन्माला आलय.  बाळाचे वजन तीन किलो ९०० ग्रॅम असून त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यता आलय. या बाळाला दोन तोंड दोन अन्ननलिका आणि दोन श्वसननिलका असल तरी शरीर एकच आहे. एक लाखा प्रसूतीमागे एखादे बाळ अशाप्रकारे जन्म घेऊ शकते. अशा बाळाला सयामी जुळे असे म्हटले जाते.

गुरूवारी सकाळी एका महिलेने बाळाला जन्म दिलाय. रूग्णालय प्रशासनाने बाळाच्या कुटूंबियाची ओळख गुप्त ठेवलीय.   या बाळाला दोन तोंडे असून शरीर एकच आहे. प्रसुतीपूर्वी सोनेाग्राफीत पोटात दोन तोंड असलेलं बाळ असल्याची कल्पना डॉक्टरांनी आईला व त्यांच्या कुटूंबाला दिली होती. त्यामुळे त्यांची मानसिकता तयार झाली होती.  अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विद्या तिरनकर, बालरोग चिकित्सा विभागातील डॉ. एस. व्ही. सावस्कर, बालरोग चिकित्सक डॉ. सुदर्शन चक्रे, बालरोग शल्यचिकित्सक डॉ. रवी कंदलगावकर हे बाळ आणि आईवर उपचार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *