ठाणे :- ठाणे लोकसभा मतदार संघात एकूण  २४ उमेदवार  रिंगणात असून खरी लढत महायुतीचे नरेश म्हस्के आणि महाविकास आघाडीचे  राजन  विचारे यांचा लढत होणार आहे. भिवंडी लोकसभा मतदार संघात ९ उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने २७ उमेदवार रिंगणात उरले आहेत, भिवंडीत खरी लढत महायुतीच कपिल पाटील महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे आणि अपक्ष निलेश सांबरे यांच्यात होणार आहे. तर कल्याण लेाकसभा मतदार संघातून २ उमेदवारांनी माघार घेतल्याने २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कल्याणात खरा सामना हा महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे आणि महाविकास आघाडी ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर यांच्यात होणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!