पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पिंपरी चिचवड महानगरपालिका ते निगडी पुणे मेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले योवळी रूबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे मेट्रोला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखविला. 

पंतप्रधानांनी आज कोलकाता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील या मेट्रो प्रकल्पांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सहभागी झाले होते.
पुण्यातील रूबी हाॅल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग ६ किमी आहे पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी हा मार्ग ४.४ किमी असून पूर्णपणे उन्नत मार्ग आहे.  यामुळे स्वारगेट ते पीसीएमसी कॉरिडॉर हा निगडीपर्यंत विस्तारित होणार आहे. गेल्या पावणे दोन वर्षांपासून महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. रेल्वे आणि मेट्रोसाठी सुद्धा राज्यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे ज्याचा फायदा नागरिकांना होत आहे. आज लोकार्पण करण्यात आलेल्या पुण्यातील मेट्रो मार्गाचे भूमिपूजन देखील आदरणीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते, आणि आज त्यांच्याच हस्ते ही मेट्रो सेवा सुरू देखील झाली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे स्मार्ट आणि दर्जेदार वाहतुकीची गरज आहे. मेट्रो सेवेमुळे ही गरज पूर्ण होऊन इंधन आणि वेळेत देखील मोठी बचत होणार आहे. मोदींची गॅरंटी असलेले सर्व प्रकल्प आणि विकास कामे गतीने सुरू असल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

 
तिकीट दर किती असेल?
 

वनाज ते रामवाडी- 30 रुपये
रुबी हॉल ते रामवाडी- 20 रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *