मुंबई : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरूणीच्या आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे त्यामुळे राठोड यांच मंत्रीपद गोत्यात आलं आहे.
बीड जिल्हयात राहणारी पूजा हि अभ्यासासाठी पुण्याला आली होती. पुण्यातील वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहत होती. काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील वानवडी परिसरात पूजा हिने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती तिच्या आत्महत्येनंतर १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत या क्लिपमध्ये मंत्री राठोड आणि त्यांच्या पीएचा आवाज असल्याचा दावा सोशल मिडीयातून केला जात आहे.
