कोळी समाजाच्या विविध प्रश्नांसंबंधी महाराष्ट्र राज्य सरकार सोबत चर्चा करणार

मुंबई : महाराष्ट्रातील तमाम कोळी बांधवांना जातीचे प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावे तसेच कोळी समाजातील वाढत्या तरूणांच्या बरोजगारीचा महत्वाचा विषय, राज्यातील समुद्रकिनारी मासेमारी करणाऱ्या समाज बांधवांच्या विविध समस्यांवर अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष केदारभाई लखेपुरीया यांनी अखिल भारतीय कोळी समाज राष्ट्रीय अध्यक्ष कुवरजीभाई बावलिया यांची राजकोट गुजरात येथे भेट घेवून महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.

महाराष्ट्रात मुंबईच्या समुद्रकिनारी राहणाऱ्या व मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांसारखे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या कोळी बांधव वसलेला असतांना सातपुडापर्वताच्या पायथ्यापासून ते सहयाद्री पर्वताच्या पायथ्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात कोळी समाज वसलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम कोळी बांधवांना कोणत्याही प्रकारच्या जाचक अटी न लावता सुलभ्ारित्या जात प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र मिळावे यासाठी तसेच महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांना अन्यायकारक जात पडताळणीमुळे अधिसंख्य पदावर वर्ग करणे, केंद्र शासनाच्या उपक्रमात काम करणाऱ्या कोळी समाजाचे निवृतीवेतन रोखून ठेवणे, तसेच मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाला नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं नुकसान भरपाई न मिळणे, कोस्टल रोड सारख्या प्रकल्पामुळे होणारे कोळी समाजाचं विस्थापन इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली.

कोळी समाजाच्या आरक्षणाचे व मासेमारीचे प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निदर्शनास आणून द्यावी असे आवाहन केदारभाई लखेपूरीया यांनी राष्ट्रीय अध्यक्ष कुवरजीभाई बावलीया यांना केले.

महाराष्ट्रातील जात पडताळणी प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्रासह मासेमारी प्रश्नांसह अखिल भारतीय कोळी समाजाच्या वतीने महाराष्ट्र सरकारची भेट घेणार असल्याचे प्रदेश अध्यक्ष केदारभाई लखेपुरीया यांनी यावेळी सिटी न्युज जर्नलिस्ट सोबत बोलतांना सांगितले. यावेळी प्रदेश अध्यक्ष केदारभाई लखेपुरीया यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश सचिव अॅड. सचिन ठाणेकर, सल्लागार जितेंद्र गाढवे, उपाध्यक्ष डॉ हरीश कोरी, हार्दिक लखेपुरीया उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *