शेतक-यांच्या विविध मागण्यांसंदर्भात, करमाळा मनसेचे तहसीलदारांना निवेदन

करमाळा /प्रतिनिधी : शेतक-यांच्या विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुक्यांच्यावतीने तहसीलदार सुशील बेलेकर आणि नायब तहसीलदार शांताराव किरवे यांची  भेट घेऊन निवेदन सादर केले.
जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, दुष्काळ ग्रस्त गावामध्ये पाण्याच्या टँकरची सोय करावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो हमीभाव मिळावा तसेच जेऊर रेल्वे स्थानकावर उद्यान एक्सप्रेसला थांबा मिळावा अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या. या मागण्या पूर्ण न झाल्यास मनसे स्टाईल ने अंदोलन करु असा इशारा मनसे तालुका अध्यक्ष संजय घोलप व जिल्हा उपाध्यक्ष आनंद मोरे यांनी दिला. यावेळी मनसे करमाळा तालुका संपर्क अध्यक्ष राम जगताप, तालुका अध्यक्ष संजय घोलप, जिल्हा अध्यक्ष सतिश फंड, जिल्हा उपाध्यक्ष आनंद मोरे विजयराज शिंदे तालुका सुहास तोरमल आदी मनसैनिक उपस्थित होते.

मनसेचे नवे करमाळा तालुका संपर्क अध्यक्ष रामराजे जगताप यांचा सत्कार 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *