डोंबिवली :  कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणने आपल्या ग्राहकांना अतिरिक्त अनामत (Deposit) रक्कमेची बिले पाठविल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. दर सहा महिन्यांनी/एक वर्षांनी अशी बिले महावितरणकडून ग्राहकांना पाठविली जात आहेत. शासनाने या संदर्भात हस्तक्षेप करून ग्राहकांची अनामात रकमेच्या माध्यमातून होणारी लूट थांबवावी, अशी मागणी पुढे आली आहे.


शिवाय नेहमी वीज दरात देखिल वाढ होत असते. त्यातच मार्चपासून वितरीत करण्यात आलेल्या बिलांच्या माध्यमातून अतिरिक्त अनामत रक्कमेची 500 ते 5000 पर्यंत बिले पाठविली जात आहेत. महावितरणकडून अनामत रक्कमेच्या माध्यमातूनलूटमार करत असल्याच्या जनसामन्यांत प्रतिक्रिया उमटत आहे. त्यातच ग्राहकांना पुरवण्यात येणाऱ्या वीज पुरवठ्यात सातत्य नसल्याने आणि काही तांत्रिक अडचणींमुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांत वाढ होताना दिसत आहे. सद्या वातावरणात वाढलेल्या जबरदस्त उकाड्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यावर नागरिक हैराण/त्रस्त झाले आहेत.

सद्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असताना अशी बीले आल्याने मतदारांना देखिल ते मान्य असावे असे गृहीत धरले जात आहे का ? आता मतदारांचाही प्रशासनावर वचक राहिला नसल्याचे यावरून दिसत आहे. तथापी याबद्दल कुणीही स्पष्टीकरण कसे देत नाही ? याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

अनामत रक्कमेतून महावितरणला दरवर्षी करोडो रुपयांचा महसूल मिळतो. महावितरणकडून अनामत रक्कमेच्या बिलांतून लूट थांबवावी. ही लूट शासनाने हस्तक्षेप करून थांबवावी, अशी मागणी डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!