मुंबई :  हिंदी सिनेमा नव्हे तर प्रत्येक प्रादेशिक भाषेतील चित्रपट हे यशस्वी होत आहेत. अनेक प्रादेशिक चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर धमाल उडवली आहे. त्यामुळे मराठी सिनेमात  काम करायला मला नक्कीच आवडेल, त्या सिनेमाची कथा वेगळी असेल असे प्रतिपादन  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते अभिनेते आयुष्मान खुराना यांनी सोमवारी  मुंबई मराठी पत्रकार संघाच्या  वार्तालाप कार्यक्रमात केले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने अभिनेते आयुष्यमान खुराना यांचा पत्रकार संघात वार्तालाप पार पडला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी मनमोकळया गप्पा मारल्या. चित्रपटातील करिअरची सुरूवात ते राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेता असा प्रवास खुराना यांनी उलगडला.  

पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांच्या हस्ते अभिनेते खुराना यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर  पत्रकार संघाचे पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण, स्वाती घोसाळकर, विश्वस्त राही भिडे, वैजयंती कुलकर्णी आपटे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना अभिनेते आयुष्मान खुराना म्हणाले की, कोणत्याही सिनेमात काम करताना तो सिनेमा हिट होईल या उद्देशाने कधीच काम करीत नाही. जी कथा कधीच पडद्यावर आलेली नाही, प्रेक्षकांसाठी वेगळी आणि नवीनच असेल आणि नवीन काही तरी करायचे या विचारानेच काम करतो. चंदीगड हि माझी जन्मभूमी असली तरी मुंबई हि कर्मभूमी आहे. सगळेजण स्वप्न घेऊन मुंबईत येतात तसाच मी मुंबईत आलो आता मुंबईकर असल्याचे खुराना यांनी सांगितले. 

राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही माझयासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.   पुरस्कार मिळेल या उद्देशाने मी कधीच काम करीत नाही. प्रेक्षकांना आवडेल भावेल अशीच नवनवीन भूमिका साकारण्याचा प्रयत्न करत असतो असे खुराना म्हणाले. नवीन डायरेक्टरबरोबर काम करूनच अनेक हिट सिनेमा दिले, नवीन डायरेक्टरकडे रिक्स घेण्याची क्षमता असते असेही त्यांनी सांगितले. 

अभिनेत्याला कोणताही जात धर्म पंथ नसतो तो देशाचे प्रतिनिधीत्व करतो देशाविषयीची आस्था जोडलेली असते त्यामुळे राजकारणाशी कोणताही संबध नसल्याचे खुराना यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.  यावेळी अभिनेता  खुराना यांनी आलमारी ही कविता सादर केली यावेळी प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळाली.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!