लोकलमध्ये चढताना धक्का लागल्याने तरूणाला मारहाण
डोंबिवली : लोकलमध्ये चढताना धक्का लागल्याने झालेल्या वादावादीतून धीरज म्हसकर या २३ वर्षीय तरूणाला जबर मारहाण केल्याचा प्रकार डोंबिवली रेल्वे स्थानकात घडला आहे. धीरज हा सांगर्ली परिसरात राहत आहे. बुधवारी सकाळी  धीरज हा ठाण्याला जाण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकातून गाडीत चढत असतानाच त्याचा धक्का एका तरूणाला लागला मात्र त्यांच्यात वादावाद झाल्याने त्या तरूणाने इतर सहा ते सात जणांच्या साथीने मारहाण केल्याचा आरोप धीरजने केला आहे. मात्र पोलिसांकडून सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप धीरजने केला असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. मात्र अधिक बोलण्यास टाळलं आहे,

पहा व्हिडीओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!