डोंबिवली 2007 मध्ये कल्याण पूर्वेत घडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वंडार पाटील यांचा मुलगा विजय पाटील यांच्या खूनप्रकरणी कल्याण न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. तब्बल 18 वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याचा निकाल सोमवार 4 तारखेला लागला.या खटल्यात एकूण 13 आरोपी होते. त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांच्यासह 10 जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. तर विजय बाबुराव वाकडे, साजिद हमीद शेख आणि सुनील रामचंद्र भोईर या तिघांवर खुनाचे आरोप सिद्ध झाले असून, न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे.सध्या दोषी ठरवलेल्या तिन्ही आरोपींना न्यायलयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. येत्या 7 ऑगस्ट रोजी त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.दरम्यान, न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निकालानंतर परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. आता या आरोपींना किती वर्षांची शिक्षा होते, याकडे संपूर्ण कल्याणकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *