
कल्याण, ता. ४ (प्रतिनिधी) –राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरलेल्या विजय पाटील हत्या प्रकरणाचा अंतिम निकाल आज कल्याण सत्र न्यायालयात दिला जाणार आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी म्हणून शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी महेश पाटील यांचे नाव आल्यामुळे प्रकरण अधिकच गाजलं होतं. निकालाच्या पार्श्वभूमीवर आज कल्याण न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून तणावाचं वातावरण आहे.विजय पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते वंडार पाटील यांचे सुपुत्र होते. २००७ साली त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात महेश पाटीलसह एकूण १३ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या १७ वर्षांपासून हा खटला न्यायप्रक्रियेत प्रलंबित होता आणि आज अखेर या प्रकरणाचा निकाल दिला जाणार आहे.प्रकरणातील राजकीय पार्श्वभूमी, साक्षीदारांचे बदलते जबाब आणि सतत होणाऱ्या सुनावणींमुळे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. वडील वंडार पाटील यांनी वर्षानुवर्षे न्यायासाठी संघर्ष केला असून, आजचा दिवस त्यांच्या दृष्टीने निर्णायक मानला जातो आहे.कल्याण न्यायालय परिसरात अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. जवळपास ४०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी, रॅपिड अॅक्शन फोर्स, सीसीटीव्ही व ड्रोनच्या मदतीने परिसरावर लक्ष ठेव
