डोंबिवली, ता. ०३ (विशेष प्रतिनिधी) – कल्याण-अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्था असलेल्या कामाच्या २०२५-२६ या वर्षासाठीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेमध्ये इंडो अम्माइन्स लिमिटेडचे माजी संचालक नारायण माने यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.या सभेमध्ये दीपक विश्वनाथन यांची उपाध्यक्ष, कृष्णा यादव यांची सचिव, तर भास्कर सोनावले यांची खजिनदार म्हणून निवड झाली आहे. याशिवाय एकूण १५ सदस्यांची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे.सभेला औद्योगिक क्षेत्रातील विविध उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या कार्यकारिणीकडून आगामी काळात उद्योगधंद्यांच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *