कल्याण : पूर्वमधील नांदिवली गाव कमानी समोरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपजवळील ‘श्री बाल चिकित्सालय’ या खासगी रुग्णालयात २१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६:४५ वाजता संतापजनक प्रकार घडला. सोनाली प्रदीप कळासारे या मराठी तरुणीवर एका नशेत धुंद परप्रांतीय तरुणाने अमानुष मारहाण केली. सोनाली ही पिसवली गावातील रहिवासी असून या क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती.डॉक्टरांच्या आदेशानुसार कोणालाही डॉक्टरांच्या केबिनमध्ये प्रवेश देऊ नये, हा नियम तिने पाळला. मात्र नशेत असलेल्या गोकुळ झा या परप्रांतीय गुंडाने जबरदस्तीने केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. सोनालीने विरोध करताच त्याने थेट तिच्या चेहऱ्यावर लाथ मारली आणि खाली पडल्यानंतर लाथाबुक्क्यांनी तिची अमानुष पद्धतीने धुलाई केली. इतकेच नव्हे तर तिचे कपडेही फाडण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे.या प्रकरणानंतर सोनालीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र तब्बल १८ तास उलटूनही आरोपी फरार राहिल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पीडित मुलीच्या घरासमोर जमा झाले असून, पोलिसांना कठोर इशारा दिला आहे.मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी सांगितले की, “चार तासात आरोपीला अटक केली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने त्याला शोधून चोप देऊ आणि पोलिसांच्या स्वाधीन करू.” भाजपचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनीही पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढले आणि आरोपीस तत्काळ अटक करावी अशी मागणी केली.या घटनेने कल्याण डोंबिवलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनावरील प्रश्नचिन्ह अधिक गडद झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *