डोंबिवली : येथील आर्यन शिरवळकर याने आफ्रिकेतील सर्वात उंच माउंट किलिमांजारो पर्वतावर यशस्वी चढाई करत भारताचा तिरंगा फडकावला आहे. फक्त तेवीस वर्षाच्या वयात डोंबिवलीतील पहिला गिर्यारोहक म्हणून आर्यनने हा ऐतिहासिक पराक्रम केला असून त्याच्या घरी परतल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.मुख्य बातमी :कल्याण पूर्वेतील एमआयडीसी परिसरात राहणारा आर्यन शिरवळकर लहानपणापासून निसर्गप्रेमी आहे. वयाच्या १५ व्या वर्षापासून गिर्यारोहणाची आवड जोपासत त्याने मनाली येथून माउंटेनेअरिंगचं प्रशिक्षण घेतलं.

वयाच्या १६ व्या वर्षी पतलसू (१३,५०० फूट) पर्वत सर केल्यानंतर आर्यनने भारतातील ५०० पेक्षा जास्त ट्रेक्स केले आहेत.६ जुलै ते १२ जुलै दरम्यान त्याने आफ्रिकेतील टांझानिया देशातील १९,३४१ फूट उंच असलेला जगातील सर्वात उंच स्वतंत्र पर्वत माउंट किलिमांजारो सर करत भारताचा झेंडा फडकावला. कमी ऑक्सिजन, उणे २० अंश तापमान, कमी वायुदाब अशा कठीण परिस्थितीतही त्याने ही मोहीम फत्ते केली.आर्यनने ABVIMAS कडून माउंटेनेअरिंग इन्स्ट्रक्टर कोर्स पूर्ण केला असून WFR प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. त्याने आतापर्यंत १० हून अधिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. सध्या तो विविध कंपन्यांसाठी आउटडोअर लीडरशिप, फर्स्ट एड आणि सुरक्षित ट्रेकिंगचे प्रशिक्षण देतो आहे. ‘Leave No Trace’ तत्त्वावर आधारित जबाबदार गिर्यारोहक घडवणे हे त्याचे ध्येय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *