
डोंबिवली, ता. २० जुलै (प्रतिनिधी):
डोंबिवलीत रविवारी भाजपच्या वतीने मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात काँग्रेस व मनसेसह विविध सामाजिक संस्थांमधील कार्यकर्ते आणि शेकडो नागरिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, “येत्या २२ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवलीमध्येही दोन ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाईल,” असे त्यांनी यावेळी जाहीर केले. डोंबिवली मंडल अध्यक्ष पवन पाटील यांनी सांगितले की,
“महाराष्ट्राच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाचा परिवार कटिबद्ध आहे. भाजपच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास आणि पक्षाचे काम पाहून विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. “रविवार, दि. २० जुलै २०२५ रोजी झालेल्या या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.या कार्यक्रमाला कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, डोंबिवली मंडल अध्यक्ष पवन पाटील, मंडल अध्यक्षा प्रिया जोशी, मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, समीर चिटणीस आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये पुढील कार्यकर्त्यांचा समावेश:- काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष शशिकांत (गणेश) चौधरी,महिला ब्लॉक अध्यक्ष गीता चौधरी,बाळा सावंत,मनसेचे कार्यकर्ते सुभाष कदम, विजय शिंदे, डोंबिवली पश्चिमेतील मनिष मोरे, राजेश नाना भोईर, विविध महिला मंडळे, सामाजिक संस्था, समाजसेवक आणि सहकारी नागरिक यांनी केला प्रवेश.
