कल्याण: ता :१२:(प्रतिनिधी):-

वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत वन विभागाने मोठी कारवाई करत प्रतिबंधित विदेशी वन्यजीव जप्त केले आहेत. या छाप्यात कासव, साप, अजगर, एग्वाणा (सरडा) यांसारख्या वन्यजीवांचा समावेश आहे. ही कारवाई खब-याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार ठाणे उपवनसंरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कल्याण वनक्षेत्राच्या अखत्यारितील नियतक्षेत्र पिसवलीमधील डोंबिवलीजवळील एक्स्पिरिया मॉलसमोरील पलवा सिटी येथील एका इमारतीत आठव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वन विभाग व राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 11 तसेच मानपाडा पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत या वन्यजीवांना ताब्यात घेण्यात आले.

कारवाई दरम्यान संबंधित आरोपी इसम घटनास्थळी आढळून आला नाही. जप्त करण्यात आलेले वन्यजीव स्थानिक स्वयंसेवी संस्था बिरसा मुंडा, कल्याण यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सुपूर्द करण्यात आले आहेत. या प्रकरणात पंचनामा व आवश्यक कागदपत्रे तयार करून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!