कल्याण: ता :१२:(प्रतिनिधी):-
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचा अधिकृत उमेदवार विश्वनाथ आत्माराम भोईर यांना समाजातून पाठींबा वाढत असल्याचे दिसत आहे. अनेक मान्यवर व्यक्तींनी समर्थन दिल्यानंतर कल्याणातील अनेक सामाजिक संस्थाही त्यांच्या पाठिंब्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत.

अशाच एका संस्थेपैकी एक असलेल्या एकता सेवा संस्थेतर्फेही विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार विश्वनाथ आत्माराम भोईर यांची ताकद आणखी वाढली आहे.यावेळी जिल्हा प्रमुख अरविंद मोरे साहेब, एकता सेवा संस्थाचे संस्थापक दिनेश भगेला, कार्यध्यक्ष सतीश भोसले, सुनील यादव तसेच संस्थाचे सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!