कल्याण: ता:09 ;( प्रतिनिधी):-
कल्याण पूर्वेत महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांच्या प्रचारार्थ महायुती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अफवांना बळी पडू नका असा आदेश दिला. पक्षाचा आदेश हाच अंतिम आदेश असतो. पक्षाचा आदेश आहे महायुतीच्या उमेदवारास प्रचंड बहुमतांनी विजयी करायचे आहे.
कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी शिंदे गटातून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढत आहेत .या पार्श्वभूमीवर आपल्याला दिलेली जबाबदारी ही तंतोतंत पाळलीच पाहिजे.आवडत असेल किंवा नसेल महायुतीचा धर्म पाळून सुलभा गायकवाड यांना प्रचंड मतांनी विजयी करा. याविषयी कोणालाही शंका येता कामा नये अशी तंबी वजा आदेश कार्यकर्त्यांना देत महायुतीच्या स्थानिक नेत्यांना महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विजयाचा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिला.
कल्याण पूर्वेतील कशिश हॉल मध्ये हा कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.त्यावेळी खासदार डॉ शिंदे हे बोलत होते.या मेळाव्याला भा ज पा ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, भा ज पा जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सूर्यवंशी,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (अप्पा) शिंदे,भा ज पा महिला जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी,विधानसभा प्रमुख निलेश शिंदे,रमाकांत देवळेकर,उपजिल्हा प्रमुख अरुण आशान,मा उपमाहापौर मोरेश्वर भोईर,भा ज पा कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, महिला मंडळ अध्यक्षा सविता देशमुख,मा नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, राजाराम पावशे, नवीन गवळी, मल्लेश शेट्टी, मा नगरसेविका हेमलता पावशे, इंदिरा तरे, राजवंती मढवी, माधुरी काळे तसेच महायुतीचे इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——–