अंबरनाथ ; ता : 30:(प्रतिनिधी):-
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातुन महायुतीचे उमेदवार डॉ.बालाजी किणीकर यांनी भव्य रॅली आणि शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सलग तीन वेळा शिवसेना पक्षातून निवडून आलेले आमदार डॉ किणीकर हे यंदा चौथ्यांदा शिवसेना शिंदे गटातून निवडणूक लढवत आहेत.
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती करिता राखीव असून महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ किणीकरांना चौथ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. व मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यमान आमदार डॉ किणीकर यांनी महायुतीच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. अंबरनाथ विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत जोशी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत कल्याण जिल्हा प्रमुख गोपळ लांडगे, शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील, बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे, उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर उपस्थित होते.
——-