कल्याण, ता. 27: –

भारतीय संविधानाच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कल्याण शहरात संविधान अमृत महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कल्याण पश्चिम मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर, ज्येष्ठ विचारवंत किरण सोनवणे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

संविधानाचा गौरव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान

जगातील सर्वात मोठी यशस्वी लोकशाही उभारण्यासाठी भारतीय संविधानाचे योगदान अनमोल आहे, असे गौरवोद्गार यावेळी प्रमुख पाहुण्यांनी काढले. भारतीय संविधानाने सामान्य नागरिकांपासून ते सर्वोच्च व्यक्तीपर्यंत सर्वांना समान अधिकार बहाल केले आहेत. याच संविधानामुळे आपण आज आमदार झालो आणि एवढ्या मोठ्या पदांवर पोहोचलो आहोत, असे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

डॉ. आंबेडकरांच्या संविधानाची प्रत वितरीत

या कार्यक्रमात उपस्थित प्रत्येक व्यक्तीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची एक प्रत मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. तसेच माता रमाबाई आंबेडकरांच्या भव्य पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशनकडून आमदार भोईर यांचे आभार मानण्यात आले.

प्रमुख उपस्थिती आणि आंबेडकरी अनुयायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या सोहळ्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार विश्वनाथ भोईर, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे, भीमराव डोळस, बाळाराम जाधव, प्रदीप जगताप, अजय सावंत यांच्यासह बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच विविध ठिकाणांहून आलेल्या आंबेडकरी अनुयायांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!