डोंबिवली: ता :27:-
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांच्या प्रचारार्थ डोंबिवली शहरात महाविकास आघाडीच्या वतीने परिवर्तन प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. डोंबिवलीच्या आयोध्या नगरी येथून रॅलीची सुरुवात होऊन महावीर नगर, गांधीनगर, सुभाष डेअरी, राही पार्क, महावीर हॉस्पिटल, पी एन टी कॉलनी, गांधीनगर चौक, गणेश नगर, आयकॉन हॉस्पिटल, आनंदनगर, पांडुरंग वाडी, मॉडेल गल्ली येथून धर्मवीर आनंद दिघे सार्वजनिक वाचनालय व ज्येष्ठ नागरिक कट्टा येथे प्रचार फेरीचा समारोप करण्यात आला.
या रॅलीदरम्यान सुभाष गणू भोईर यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिक, दुकानदार, फेरीवाले आणि स्थानिक रहिवाशांसोबत संवाद साधत महाविकास आघाडीची भूमिका आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारकडून जनतेला दिलेल्या आश्वासनांची फसवणूक झाल्याचा मुद्दा मांडून, या फसवणुकीला विरोध दर्शवण्यासाठी भोईर यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी जोमाने प्रचार केला. या रॅलीत संपर्क संघटिका मृणाल यज्ञेश्वर, जिल्हा संघटिका वैशाली दरेकर, कल्याण ग्रामीण संपर्क प्रमुख अरविंद बिरमोळे, शहर प्रमुख अभिजित सावंत, युवा सेना जिल्हा अधिकारी प्रतिक पाटील, उपशहर प्रमुख वायकोळे, शहर संघटिका मंगला सुळे, उपशहर संघटिका स्मिता पाटील, शुभदा देसाई, उप विभागप्रमुख जगदीश जुलूम, विभाग प्रमुख मंगेश मोरे, उप विभाग प्रमुख रेवणकर, शाखाप्रमुख मंगेश सरमळकर, सागर पाटील, वंदना बेल्हेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—-