डोंबिवली : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 24 – कल्याण लोकसभा मतदार संघातील, 142 – कल्याण पूर्व विघानसभा मतदार संघात रविवारी सुट्टीच्या दिवशी मतदार जनजागृतीकरण्यात आली. या रॅलीला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांचे मार्गदर्शनाखाली स्वीप पथकातील (मतदार जनजागृती पथक) महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे यांच्या अधिपत्याखाली मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यासह प्रोत्साहित करण्याकरिता बाईकरॅली काढण्यात आली होती. या रॅलीला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.


कल्याण च्या ड प्रभागक्षेत्र कार्यालय येथून 142 – कल्याण-पूर्व विधानसभा मतदार संघ परिसरात नागरिकांमध्ये मतदानाचे महत्व पटवून मतदान जनजागृतीसाठी या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शाळा व महाविद्यालयांचे शिक्षक, पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि बीट मार्शल यांनी उस्फूर्तपणे  सहभाग घेतला. त्याचप्रमाणे 142 – कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघ परिसरातील गावा-गावांतील चौकांमध्ये जाऊन मतदान करण्याविषयी घोषणा देण्यात आल्या. तसेच मतदान जनजागृतीपर गीत/गाणी वाजवून मतदान करण्याबाबतचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी स्वीप टिमचे कर्मचारी  समाधान मोरे, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, प्रणव देसाई, अदिती पवार, प्रियंका पडवळ, प्रतिक्षा भोईर, भारती डगळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!