डोंबिवली : एक देशी बनावटीचा गावठी कटट्टा आणि एक जिवंत काडतुस विनापरवाना बेकायदेशिर रित्या कब्जात बाळगणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यश मिळविले.राजु तिवारी (५३ ,रा. नवी मुबंई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
कल्याण गुन्हे शाखेचे पोहवा दत्ताराम भोसले व गुरूनाथ जरग यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, टिळकनगर पोलीस ठाणे हददीत डोंबिवली पुर्वच्या शेलार नाका येथे एक इसम देशी बनावटीचा कटट्टा विकी करण्याकरीता येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती. सदर मिळालेल्या माहितीची व.पो.निरी. नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सदर ठिकाणी जावून सापळा रचून दुपारच्या सुमारास राजु तिवारी यास २० हजार रूपये किंमतीचा एक देशी बनावटीचा कटट्टा व एक जिवंत काडतुस अशा विनापरवाना बेकायदेशिर रित्या शस्त्रासह ताब्यात घेऊन त्यास अटक करण्यात आले .