डोंबिवली : ठाकुर्ली रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या एका मोठ्या झाडाला आग लागली की लावली, हे समजू शकले नाही. बहुदा उष्णतामानामुळे या झाडाला लागली असावी. तथापी आग पसरून मोठी दुर्घटना घडू शकते, याकडे जागरूक ठाकुर्लीकर मंदार अभ्यंकर यांनी रेल्वे प्रशासनाचे एक्स अकाऊंटवर ट्विटद्वारे लक्ष वेधले आहे.

या झाडाला आग लागल्याची छायाचित्रे, व्हिडियो आणि माहिती मंदार अभ्यंकर यांनी तात्काळ एक्स अकाऊंटवर ट्विट केले. विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनाने एक्स अकाऊंटवर केलेल्या ट्विटच्या सूचनेला प्रतिसाद देऊन रेल्वे सुरक्षा बालाला कारवाईसाठी सूचित केले. याची गंभीर दखल घेऊन रेल्वे सुरक्षा बालाने अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे रेल्वेच्या ट्रॅकला लागून असलेले झाड ही वाचले. तसेच रेल्वे ट्रॅकजवळच आग लागून मोठी दुर्घटना घडली असती ती सुद्धा टाळता आल्याचे जागरूक रहिवासी मंदार अभ्यंकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *