मुंबई (अजय निक्ते): फायटर’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्येही क्रेझ पाहायला मिळत आहे. भारतातील पहिल्या एरियल ऍक्शन चित्रपटाच्या स्टार कास्टने किती मानधन आकारले याबाबत बॉलिवूड मध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.


या चित्रपटासाठी हृतिक रोशनने सर्वाधिक फी घेतली आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार या चित्रपटासाठी हृतिकला ५० कोटी रुपये फी देण्यात आली आहे. तर चित्रपटाची मुख्य अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला या चित्रपटासाठी १५ कोटी रुपये देण्यात आले आहेत असे सांगितले जाते. या चित्रपटात अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत असून त्याला ७ कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे. तर करण सिंग ग्रोव्हरही या चित्रपटात दिसणार असून त्याला २ कोटी रुपये मिळत आहेत. या चित्रपटाचा आणखी एक अभिनेता अक्षय ओबेरॉय या चित्रपटासाठी एक कोटी रुपये मानधन घेत आहे अशी चर्चा बॉलीवूड मध्ये आहे. भारतात बनत असलेला हा पहिलाच एरियल ऍक्शन चित्रपट असून त्याच्या प्रदर्शनाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!