मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा आज वाढदिवस. भाईजानने आज ५८ व्या वर्षात पर्दापण केले. कुटूंबियांसमवेत केक कापून वाढदिवस झाला केला. सलमानला शुभेच्छा देण्यासाठी लाखो फॅन्सने घराबाहेर गर्दी केली होती. करोडो हृदयांवर राज्य करणाऱ्या भाईजानबद्दल तुम्हाला माहिती आहे का, की त्याची पहिली कमाई ७५ रुपये होती. ७५ रूपयांपासून त्याने करिअरची सुरूवात झाली आणि आज करोडोंचा मालक आहे.
सलमान खानने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्याचे चाहते हे भारतातच नाही तर परदेशातही आहेत. करोडो हृदयांवर राज करणाऱ्या भाईजानबद्दल तुम्हाला माहिती आहे का, की त्याची पहिली कमाई ७५ रुपये होती. सलमान खान आज बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहे, पण फार कमी लोकांना माहित असेल की भाईजानची पहिली कमाई फक्त ७५ रुपये होती. मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सलमानने हे सांगितले हेाते. त्याची पहिली कमाई फक्त ७५ रुपये होती, जी त्याला ताज हॉटेलमध्ये डान्स करण्यासाठी मिळाली होती. सलमानने सांगितले होते की, ताज हॉटेलमध्ये होणाऱ्या शोमध्ये त्याचा मित्रही डान्स करत होता, त्यामुळे तो त्याला सोबत घेऊन गेला होता. सलमानने बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले, त्यानंतर त्याला यासाठी ७५ रुपये मिळाले. सलमानला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी ३१ हजार रुपये मानधन मिळाले होते.
सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले
अभिनेता होण्यापूर्वी सलमान खानने सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले होते. जॅकी श्रॉफ स्टारर ‘फलक’ या चित्रपटातून त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. अभिनेता म्हणून सलमान खानचा पहिला चित्रपट ‘बीवी हो तो ऐसी’ होता, पण त्याला ओळख त्याच्या दुसऱ्या चित्रपट ‘मैने प्यार किया’ मधून मिळाली. शाहरुख खानच्या आधी सलमान खानला बाजीगर हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. मात्र त्यात दाखवण्यात आलेल्या दुर्लक्षित भूमिकेमुळे त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला.
तर सलमान बाजीगर बनला असता
शाहरुखचा ‘बाजीगर’ हा चित्रपट सर्वांना आठवत असेल. हा चित्रपट किंग खानच्या करिअरमधला ब्लॉकबस्टर ठरला होता, पण शाहरुखच्या आधी अब्बास मस्तानने सलमानला याची ऑफर दिली होती. त्याचवेळी नकारात्मक भूमिकेमुळे भाईजानने यासाठी नकार दिला होता. द कपिल शर्मा शोमध्ये सलमानने स्वतः याचा उल्लेख केला होता.
सलमान खानचे पूर्ण नाव
संपूर्ण जग अभिनेता सलमान खानला या नावाने ओळखत असले तरी त्याचे पूर्ण नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान आहे हे फार कमी लोकांना माहित असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की अभिनेत्याचे हे नाव त्याचे वडील सलीम खान आणि आजोबा अब्दुल रशीद खान यांच्या नावांचे संयोजन आहे.