मुंबई दि.९ : सर्वसामान्य जनतेला सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत २४ कोटी ४२ लाख रुपये किंमतीचा भेसळयुक्त अन्न पदार्थाचा साठा जप्त केला आहे,तर ९ कोटी रुपये किंमतीचा गुटखा हस्तगत करण्यात आला असून विक्रेत्यांविरुद्ध भादवी कलम ३२८ सह इतर कलमाखाली गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

दिवाळीच्या काळात मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, फराळ जिन्नस या पदार्थाना प्रचंड मागणी आहे. ही संधी साधून काही मंडळी या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करतात. ही भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून गेल्या तीन महिन्यांत ५२४४ हॉटेल, रेस्टॉरंट,रेस्तराँ इत्यादी ठिकाणांची तपासणी करून भेसळयुक्त दूध, मिठाई,खवा ,मावा, सूर्यफूल आणि पामोलिन तेल आदी पदार्थाचा २४ कोटी ४२ लाख रुपये किंमतीचा भेसळयुक्त अन्न पदार्थाचा साठा जप्त केला आहे,यावरून आपल्या लक्षात येईल की,किती मोठ्या प्रमाणात कमी दर्जाचे भेसळयुक्त अन्न पदार्थ जनतेला देण्यापासून संरक्षण देण्यात आले आहे.

सद्या अन्न व औषध प्रशासनाने भेसळखोरांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. या भेसळखोरीला आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे भरारी पथके देखील नेमली आहे.राज्यात सुगंधीत पानमसाला व गुटख्यावर बंदी असतानाही त्याची सर्रास विक्री केली जाते. अन्न व औषध प्रशासन विभागाकडूनही चोरीछुप्यारीतीने प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून ९ कोटी रुपये किंमतीचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे.
**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *