नवी मुंबई : संत शिरोमणी श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष निमित्त रायगड – ठाणे- नवी मुंबई वारकरी संप्रदाय यांच्यावतीने​ दि ४ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान सेंटर पार्क मैदान​, खारघर नवी मुंबई येथे​  ​राष्ट्रीय वारकरी ​म​हाअधिवेशन व अखंड हरिनाम सप्ताहाचे ​आयोजन करण्यात आले आहे​. नऊ दिवस चालणा-या या महाअधिवेशनात भारताच्या चारही पिढाचे पिठाधिश्वर  जगदगुरू शंकराचार्य,  सकल संताचे वंशज, ज्येष्ठ कीर्तनकार, वारकरी व फडकरी यांच्या पवित्र उपस्थितीत भव्य दिव्य सोहळा हेाणार आहे. या महाअविधेशनाच्या प्रचार प्रसारसाठी ​प्रत्येक गावागावात जनजागृती​ करण्यात येणार आहे. यासाठी रविवारी  नवी मुंबईतील मु​रबी या गावातून प्रचार दिंडी​तून शुभारंभ करण्यात आला. 

संत विचारांचा प्रचार​, प्रसार करून मानवी जीवनाला ऐहिक व पारलौकिक सुखी जीवनासाठी संतांचे विचार प्रत्येक घरी व घरातील प्रत्येकासाठी देता यावेत म्हणून​ या कार्यक्रम मागील हेतू आहे. या महाअधिवेशनात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायिक परंपरेची आचारसंहिता जोपासणारे थोर साधू महात्मे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. अखंड हरिनाम सप्ताह काळात पहाटे काकडा भजन प्रार्थना विष्णुसहस्रनाम ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण जय श्री ज्ञानेश्वराच्या पारायणाने ज्ञान समाधान प्राप्त होत असते अशा सर्वांची अनुभूती पाहावयास मिळणार आहे.

​या महाअधिवेशनात संतवीर   श्रीगुरू हभप बंडातात्या महाराज कराडकर यांच्या उपस्थितीत आणि श्रीमद भागवत कथा प्रवक्ते श्री गुरू हभप चंद्रशेख महाराज देगलूरकर यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमदभागवत कथा, महापुराण कथामृतांचे रसपान होणार आहे. दररोज एक लाख भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे.​तसेच या भव्य दिव्य अधिवेशनात ५००० टाळकरी, ५००० ज्ञानेश्वरी वाचक, ३ हजार मृदंगवादक​  उपस्थित राहणार आहेत. ​ 

मुर्वी गावातून जनजागृतीचा शुभारंभ ..

खारघर येथे प्रथम हेात असलेल्या भव्य दिव्य राष्ट्रीय वारकरी अधिवेशनाच्या प्रचार प्रसारासाठी व गावागावात जनजागृती करण्यासाठी नवी मुंबईतील मुरबी गावातून प्रचार दिंडी काढण्यात आली. जय जय राम कृष्ण हरी.., विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा… या  विठ्ठल नामाच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात, लहान थोर महिला वारकरी​ दिडींत विठूनामात तल्लीन झाले होते.​ राष्ट्रीय वारकरी महाअधिवेशनाच्या कार्यक्रमाचे पत्रक गावागावात वाटण्यात आ​ले. प्रचार दिंडीचे​ गावातील महिलांनी​ पंचारती करून ​स्वागत केले. ही जनजागृती शोभायात्रा १५ गावात आणि ३ तालुक्यात काढली जाणार आहे. त्यानंतर शहरी भागात शोभायात्रा काढली जाणार आहे अशी माहिती हभप धनाजी महाराज यांनी ​दिली.​ याप्रसंगी हभप मोहन शेठ​ म्हात्रे,​ हभप संतोष केणे, ​ह​भप पुंडलिक महाराज फडके,​ हभप हनुमान महाराज, हभप कृष्णा महाराज​, हभप अरुण पाटील​,​ हभप अजय पाटील आदी उपस्थित होती. 

 कोळेगावात ठाणे जिल्हयाचे कार्यालय सुरू 

डोंबिवली : राष्ट्रीय वारकरी महाअधिवेश​नाच्या तयारीसाठी ठाणे जिल्हयाचे मध्यवर्ती कार्यालय जय हनुमान व्यायामशाळा, कोळेगाव येथे सुरू करण्यात आले. रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. या उद्घाटनप्रसंगी   ह​.भ​.प​. धनाजी महाराज पाटील​, कीर्तनकार जयेश महाराज, ह​.भ​.प​. मोहन शेठ म्हात्रे, ह​.भ​.प​. संतोष केणे​, अजय बुवा पाटील​, हभप हनुमान महाराज​, बाळकृष्ण महाराज, भानुदास भोईर महाराज​व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रेमनाथ पाटील यांच्या हस्ते नारळ वाढ​वून करण्यात आला.​ याप्रसंगी गजानन पाटील, जय जय राम वायले,  अरुण वायले,​ सुवर्णा भोईर, सुरेखा संते, सीताबाई पाटील शारदा पाटील, अंजू भोईर​, शारदा पाटील​, पार्वतीबाई पाटील​, जनाबाई पाटील​, सुशिलाबाई पाटील​ आदी उपस्थित होते. यावेळी हरिपाठ सादर करण्यात आला. 

अधिक माहितीसाठी संपर्क करा
ह.भ.प. धनाजी महाराज पाटील – मो. ०९३२२९४०९७४
ह.भ..प पुंडलिक महाराज फडके – मो. ०९८७०९१२७१७
ह.भ.प. मोहन म्हात्रे –          मो. ०९२२१०६५२७७
ह.भ.प. संतोष अर्जुन केणे –      मो. ०९८३३४६२३७७
ह.भ.प. अजय पाटील –          मो. ०९६२३०७१८५५
ह.भ.प. मछिंद्र भोईर –          मो. ०९३२६७७९३४६
ह.भ.प. रामकृष्ण महाराज घरत – मो. ०७३०३३६८७७७
ह.भ.प. हरेश डायरे,          –  मो. ०९०११३८८८३८
मुख्य कार्यालय : गावदेवी मैदान, सेंट्रल पार्क जवळ, खारघर, नवी मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!