पुणे, 25 एप्रिल: देशात ५४२ लोकसभा मतदारसंघांपैकी जे १० लोकसभा मतदारसंघातील जागा लढवत आहे, ते जाहीरनामा प्रसिद्ध करतात आणि त्यावर आम्ही असे करू तसे करू, असे म्हणतात. यावर कोणाचा विश्वास बसेल का? अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आज जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण 48 जागा आहेत. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आता जवळजवळ सुटला आहे. गेल्या वेळेपेक्षा महायुतीला निश्चितच चांगलं यश मिळेल आणि गेल्या वेळेपेक्षा आमच्या जास्त जागा निवडून येतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र नक्की किती जागा जिंकणार याचा निश्चित आकडा नमूद करणं त्यांनी टाळलं. सगळं आलबेल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मी आणि इतर सर्व घटक पक्ष सोबत आहोत.

दरम्यान सुप्रिया सुळेंना निवडून देणं म्हणजे राहुल गांधींना निवडून देणं आणि सुनेत्रा पवारांना निवडून देणं म्हणजे मोदीजींना विजयी करणं हे बारामतीच्या जनतेला माहीत आहे. बारामतीची जनता मोदीजींच्या पाठिशी आहे, असं सांगत फडणवीस यांनी बारामतीमध्ये सुनेत्रा पवारच जिंकतील असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!